नमस्कार मंडळी , सर्व जण मला विचारतात "तू नेहमी म्हणजे जास्त करून ऍनिमेशन (Animation) चित्रपट का पाहत असतोस ?" यावर मला त्यांना एकच सांगणं आहे कि ऍनिमेशन चित्रपटांची स्टोरी खूप नाविन्यपूर्ण असते. त्यामध्ये काही ना काही ट्विस्ट असतोच जो पाहणाऱ्याला शेवट पर्यन्त जखडून ठेवतो. तर मंडळी आजच्या या लेखात आपण सुझुमे या ऍनिमेशन चित्रपटाच रिव्हिव्ह करणार आहोत. चला तर मग सुरु करू suzume movie review in marathi.
सर्वप्रथम सांगायचं झाल तर सुझुमे हा चित्रपट 11 November 2022 रोजी जपान मध्ये रिलीज केला गेला. तर भारतात तो आपल्याला हिंदी भाषेत April 21 पाहायला भेटला म्हणजेच रिलीज केला. या चित्रपटाचे दिग्दर्शक माकोतो शिंकाई असून चित्रपटाचे लेखन देखील त्यांनीच केले आहे. ह्या फिल्मची कथा खूपच मनोरंजन आणि नावीन्यपूर्ण असून प्रेक्षकाला शेवटच्या क्षणापर्यंत जखडून ठेवते.
सुझुमे नो टोजिमारी (Suzume) movie review in marathi |
युअर नेम (Your Name), वेअथेरिन्ग विथ यु (Weathering with You) नंतर सुझुमे (Suzume) हा चित्रपट देखील मास्टरपीसच आहे असे म्हणाव लागेल. या चित्रपटाला IMDB वर 10 पैकी 7.7 चे रेटिंग आहे. तर आतापर्यंत सुझुमे चित्रपटाने 1 अवॉर्ड जिंकला असून 2 वेळा नॉमिनेशन मिळाले होते. गुगलच्या अहवाल नुसार सुझुमे पाहणाऱ्या 100 लोकांपैकी 96 लोक या चित्रपटास पसंत करतात. सुझुमे हा जापनीज चित्रपट असून त्याचे जापनीज नाव सुझुमे नो टोजिमारी (Suzume no Tojimari) आहे. हा चित्रपट एकूण 2 तास 2 मिनिटांचा असून तो ऍनिमेशन / कल्पनारम्य (फँटसि), ऍक्शन, उत्कंठा वाढविणारा adventurous प्रकारात मोडतो. सुझुमे आपल्याला Suzume english dub तसेच Suzume hindi dub मध्ये पाहायला मिळेल. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरातून $174,404,541 कमाई केली आहे.
या चित्रपटाची सुरुवात सांगायची झाली तर सुझुमे इवातो व सोता मुनकता हे प्रमुख पात्र आहेत, मियाझाकी या किनारपट्टीच्या एका छोट्याशा गावात, सुझुमे इवातोला स्वप्न पडले की तिची आई तिला जादूच्या जगात एक तुटलेली खुर्ची देते. एके दिवशी सकाळी, तिला परिसरातील निर्जन ठिकाणे शोधत असलेला एक तरुण भेटतो. ती त्याला जुन्या ऑनसेन रिसॉर्टबद्दल सांगते आणि ते आपापल्या मार्गाने निघून गेले. सुझुमे, त्या तरुणाला आधी भेटली आहे असे वाटून तिकडे जाते. तथापि, तिला त्याऐवजी एक दरवाजा सापडतो. ते उघडल्यानंतर, तिला तिच्या स्वप्नात जग सापडते, परंतु त्यात प्रवेश करता येत नाही. तिने पुन्हा प्रयत्न केल्यावर ती एका दगडाला धडकते. जेव्हा ती त्या दगडाला उचलते तेव्हा त्याचे मांजरीचे पिल्लू बनते आणि पळून जाते. गोंधळलेली आणि घाबरलेली सुझुमे शाळेत परत येते.
नक्की वाचा -- The Founder -प्रेरणादायी Movie review in marathi
दुपारच्या जेवणाच्या वेळी, सुझुमेला भूकंप येण्यापूर्वी रिसॉर्टमधून धूर येत असल्याचे लक्षात येते. ती पुन्हा पाहते तेव्हा धूर आता लाल रंगाचा खांब झाला होता. चिंतेत, असलेली ती त्या पडक्या रिसॉर्टमध्ये धावत गेली आणि पाहते तर काय , दरवाजातून धूर येत आहे आणि तो तरुण तो बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याची धडपड पाहून सुझुमे त्याच्या मदतीला धावते, धूर खाली खेचला जातो, ज्यामुळे मोठा भूकंप होतो. तो पुन्हा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न करतो, परंतु सुझमने विरोध करूनही त्याला मदत केली. आपले मन दुसरीकडे वळवण्यासाठी रिसॉर्ट दिवसांचे संभाषण सुरु आहे अशी कल्पना केली, आता ते दार बंद करण्यास पुन्हा सुरुवात करतात आणि तो माणूस त्याच्या गळ्यातल्या चावीने दरवाजा लॉक करतो. यानंतर, लाल खांब नाहीसा होतो आणि थोडा वेळ पाऊस पडतो.
सुझुमे नो टोजिमारी (Suzume) movie review in marathi |
सुझुमे (Suzume) त्या माणसाला घरी घेऊन जाते आणि त्याने स्वतःची ओळख सोता मुनाकाटा अशी केली. तो सुझुमला सांगतो की, जादूई जगाच्या किड्याला भूकंप होण्यापासून रोखण्यासाठी त्याने निर्जन ठिकाणी दरवाजे शोधून बंद केले पाहिजेत आणि हेच त्याचे काम आहे. त्यानंतर त्या दोघांना एक मांजर दिसली आणि तो बसलेल्या लहान मुलाच्या खुर्चीत बदलून जातो. सोता खुर्चीत बदलून गेला असल्याने त्याच रूपात ती त्या मांजराचा पाठलाग करतो पण ते मांजर दोघांना चकमा देऊन पळून जाते. सोता नंतर सुझुमेला सांगतो की मांजर एकेकाळी कीस्टोन होती आणि ती काढून टाकल्यानंतर किडे आजाद झाले ज्याच्यामुळे जपान मध्ये खूप भयानक भूकंप येऊन ते नष्ट होणार असते.
पुढे खुर्चीमध्ये बदलून गेलेला सोता आणि सुझुमे, दोघे मिळून डायजिन या मांजराला कसे पकडतात ? सुझुमे व सोताचे प्रेम कसे घडते , सुझुमे सोताला कशाप्रकारे पुन्हा जिवंत करते हे पाहताना खरंच हा चित्रपट कसा मास्टरपीस बनला याची प्रचिती येते. चित्रपटातील विसुअल्स आणि सनसेट, एक विशिष्ट कलाकृती व मांडणी पाहताना मनाला एक वेगळाच आनंद देऊन जाते. या चित्रपटाचे दिग्दर्शक व लेखक माकोतो शिंकाई (Makoto Shinkai) यांचे कौतुक करावे तर थोडेच आहे. जागतिक स्तरावरील पार्श्वभूमी सूर्यप्रकाश, ढग आणि पावसाच्या थेंबांच्या चमकदार अनुक्रमांनी भरलेली आहे ज्यासाठी शिनाकी आणि त्याची टीम खूप प्रसिद्ध आहे आणि प्रकाश आणि सावल्यांवर त्याचे प्रभुत्व नेहमीप्रमाणेच जादूचे बंधन आहे.
सुझुमे नो टोजिमारी (Suzume) movie review in marathi |
या चित्रपटाची सर्व स्टोरी सांगून मला तुमची उत्सुकता संपवायची नाहीये, मित्रानो खरंच ही एक अतिशय उत्कृष्ठ आणि अनोखी स्टोरी आहे. मी प्रत्येकाला म्हणजे हा रेव्हिव वाचणाऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही नक्की हा चित्रपट पहा तुम्ही तुमचा अमूल्य वेळ वाया घालवला नाही असे तुम्हाला जाणवेल. तुम्हाला हा चित्रपट हवा असल्यास कंमेंट करून सांगायला विसरू नका. आम्ही तुम्हाला Suzume no Tojimari Download करण्याची लिंक देवू .
नक्की वाचा -- The Pursuit of happyness - जगायला शिकवणारा चित्रपट
या चित्रपटातून आपल्याला काय शिकायला मिळत :
(Suzume no Tojimari) movie review in marathi या चित्रपटातून आपल्याला शिकायला भेटते ती देशभक्ती, प्रेम, जिद्द आणि चिकाटी. आपला देश जपान संकटात असताना देशाला भूकंपापासून वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणे. व आपण ज्याला जीव लावला अश्या व्यक्तीला परत आणण्याची धडपड मग ते करताना स्वतःचे अस्तित्व देखील मिटू शकते हे माहित असून प्रयत्न करणे खरंच दिग्दर्शकाने उत्कृष्टरित्या मांडले आहे.
Rating By Joshmarathi - 8/10*
मंडळी आपण सुझुमे नो टोजिमारी (Suzume no Tojimari) movie review in marathi जाणून घेतला. पुढचा लेखामध्ये कोणत्या चित्रपटावर तुम्हाला रिव्हिव्यू (movie review in marathi) वाचायला आवडेल हे सांगायला विसरू नका. धन्यवाद 🙏
टिप्पणी पोस्ट करा