नमस्कार मंडळी, मणिपूर मध्ये हिंसाचार (Manipur Violence in Marathi) चालू आहे. गेल्या सहा महिन्यांपासून मणिपूर धुमसते आहे. (Manipur Violence) तिथे भाजपची सत्ता असून देखील सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष होतय अशा अनेक चर्चा तुम्ही ऐकत असाल पण हे सगळं का होतय ? नेमक्या कोणत्या गटांमध्ये संघर्ष उफाळलाय ? दोन समाजातल्या या संघर्षाचा (What is the reason of Manipur violence?) नेमका इतिहास काय ? असे प्रश्न प्रत्येकाला पडले असतील आजच्या या लेखातून मणिपूर हिंसाचार याबाबत माहिती घेऊयात.
मणिपूर का धुमसते आहे ? Manipur Violence in Marathi |
मणिपूर मधल्या संपूर्ण हिंसाचाराचे (Manipur Violence in Marathi) मूळ हे नॉर्थ ईस्ट मधल्या इतर राज्यांसारखंच दोन प्लॅन मधला किंवा समुदायातल्या संघर्षामध्ये आहे. मैतेई (Meitei) आणि कुकी (Any Kuki tribes) हे समुदाय एकमेकांविरोधात उभे ठाकलेल्या आहेत. या मधील संघर्षाला ऐतिहासिक दृष्ट्या चालत आलेल्या भौगोलिक आणि धार्मिक संघर्षाची किनार आहे.
मणिपूरची भौगोलिक रचना (Geographical Structure of Manipur)
भौगोलिक कारणांपासून मणिपूरची भौगोलिक रचना बघताना मणिपूरचे हिल्स (Manipur Hill Area) म्हणजे पर्वतीय भाग आणि व्हॅली (Manipur Vally Area) म्हणजेच खोरे असे दोन विभाग केले जातात मणिपूरचा 90 टक्के भाग हा हिल्स मध्ये येतो या भागात कुकी (kuki) आणि नागा (Any Naga tribes) या आदिवासी जमातींचे प्राबल्य आहे तर व्यालीचे रचना मात्र यापेक्षा संपूर्णपणे वेगळीच आहे . व्यालीचे क्षेत्र हे मणिपूरच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या केवळ दहा टक्केच आहे मात्र मणिपूरची तब्बल 60% लोकसंख्या याच भागात राहते त्यामुळे राज्यातले हे महत्त्वाचे समूह भौगोलिक दृष्ट्या एकमेकांपासून संपूर्णपणे वेगळं असल्याचे चित्र आहे. असाच फरक धार्मिक दृष्ट्या देखील आहे. व्यालीमध्ये राहणाऱ्या आदिवासी जमाती या प्रामुख्याने ख्रिश्चन धर्माचे पालन करतात तर व्याली मधले मैतेई (Meitei) समाजाचे लोक हे बहुसंख्य हिंदू समाजाचे आहेत यासोबतच बंगाल मुस्लिम देखील मैतेई समाजाचा भाग आहेत मात्र हिंदू आणि ख्रिश्चन हेच दोन मणिपूर मधले प्रमुख धर्म आहेत. या दोन्ही धर्मांची लोकसंख्या पहायची झाली तर 2011 च्या जनगणनेनुसार मनिपुर (manipur) मधील ख्रिश्चन आणि हिंदू यांची लोकसंख्या ही आता समसमान झालेली असून दोन्ही समाजाची लोकसंख्या प्रत्येकी 41% इतकी आहे महत्त्वाचं म्हणजे १९६१ च्या जनगणनेत मणिपूरच्या एकूण लोकसंख्येत हिंदूंची संख्या 61% होती आणि ख्रिश्चन समुदायाची लोकसंख्या 19% होती.
नक्की वाचा -- NATO म्हणजे काय ? संपूर्ण माहिती.
मणिपूरची ही बदलती डेमोग्राफी देखील संघर्षाचे प्रमुख कारण ठरते मणिपूरमध्ये आपली लोकसंख्या कमी होत असल्याने बहुसंख्य मैतेई (Meitei) समाज असुरक्षिततेची भावना आहे आणि कुकी, नागा (Naga) लोक मोठ्या प्रमाणात राज्य बाहेरून घुसकुरी करत असल्याने त्यांच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होतीये असा मैतेई समाजाचा आरोप आहे तर नागा (Naga) आणि कुकी (kuki tribe) आदिवासी मात्र त्यांच्या या वाढत्या लोकसंख्येनुसार त्यांच्या हक्कासाठी अधिक खंबीरपणे पुढे येऊ लागले त्यामुळे हिल्स मधील कुकी क्रिश्चन विरुद्ध व्यालीमधील मैतेई (Meitei) हिंदू असे देखील चित्र या संघर्षामुळे उभे राहत. मात्र इथे महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे भारतात इतर ठिकाणी सर्व समुदाय एकमेकांमध्ये मिसळले असं असताना मणिपूर मध्ये अजून सुद्धा अशी विभागणी कायम कशी आहे. तर या दोन समुदायांचे एकमेकांवर कोणतंच स्वावलंबित्व नाहीये का ? तर यासाठी आपल्याला मनिपुरच्या शेकडो वर्ष जुन्या इतिहासावर एक धावती नजर टाकावी लागेल.
मणिपूरचा इतिहास (History of Manipur)
कधीकाळी निसर्गाची पूजा करणारा मणिपूर समाज म्हणजे मैतेई (Meitei) आणि कुकी (kuki). पण आता हा समाज हिंदू ख्रिश्चन संघर्षा पर्यंत करता येऊन पोहोचलाय याचे उत्तर देखील या इतिहासात मिळते. मणिपूरच्या लिखित इतिहासाची सुरुवात होते मैतेई लोकांपासून असं सांगितलं जातं की मैतेई (Meitei) लोक हे शेकडो वर्षांपूर्वी बाजूच्या म्यानमार मधून येऊन व्यालीमध्ये (manipur vally) स्थायिक झाले होते आणि इथून पुढे शेकडो वर्ष मैतेई (Meitei) राजांच मणिपूर वरती वर्चस्व राहिलं होत. मात्र या मैतेई समाजाचे हिल्स वर राहणाऱ्या आदिवासी कम्युनिटी शी संबंध नेहमीच गुंतागुंतीचे राहिलेले आहेत हिल्स मध्ये असणाऱ्या नागा (Naga) आणि कुकी (kuki tribe) समाजावर वेळोवेळी आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न त्यांनी केला मात्र त्या मध्ये त्यांना यश आलं नाही त्यामुळे दोन्ही समूहात संघर्ष मात्र अटळ झाला काही काळी या दोन्ही कम्युनिटी एकच आलेल्या होत्या मात्र संघर्षाची पार्श्वभूमी असल्याने या दोन्ही कम्युनिटीमध्ये रोटी भेटीचे व्यवहार मात्र झालेले नाहीत दोन्ही समाजाची स्वतंत्र संस्कृती आणि राहणीमान मात्र चालू राहिलं.
नक्की वाचा -- सेंगोल म्हणजे काय ? What is Sengol in Marathi
18 व्या शतकाच्या सुरुवातीला मैतेई (meitei) राज्याचा कुंभ (kumbh) हे भाग यांनी पर्शियन भाषेत गरीब नवाझी पदवी घेतली त्याने ब्राह्मण प्रभावाखाली येत हिंदू धर्म स्वीकारला आणि त्याच्या प्रजेने हिंदू धर्माचे पालन करावं अशा आज्ञा काढली त्यांनी बळाचा वापर करून मैतेईचे (Meitei) स्थानिक पवित्र धार्मिक साहित्य जाळलं त्यासोबतच त्याने मणिपूर(manipur) मध्ये शाकाहार लादण्याचा प्रयत्न केला लोकांनी मृतांना दफन करण्याऐवजी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करायला त्यांनी भाग पाडल सुरुवातीला निसर्ग पूजक असलेल्या मैतेईसाठी हा मोठा बदल होता मात्र राजानेच हिंदू धर्म स्वीकारल्याने मैतेई समाजात हिंदू धर्म मोठ्या प्रमाणात पसरला गेला.
या घटनेनंतर मैतेई (meitei) आणि हिल्स मधले ट्रायबल (Trible) यांच्यातली मात्र सांस्कृतिक दरी अजूनच वाढत गेली. पुढे १८९१ मध्ये ब्रिटिशांनी मणिपूर वरती ताबा मिळवला त्यावेळी ब्रिटिशांनी मैतेई राजा कायम ठेवला मात्र ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली राज्य करण्याची जबाबदारी ही त्याच्यावर आली यात संधीचा फायदा घेत ब्रिटिश मिशनरी मणिपूर मध्ये पोहोचले आणि त्यांनी मणिपूरमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार करायला सुरुवात केली त्यासाठी त्यांनी हिल्स मध्ये असणाऱ्या आदिवासी समाजाची निवड केली आणि आदिवासी समाजात ख्रिश्चन धर्म मोठ्या प्रमाणात पसरवण्याला सुरुवात झाली संपूर्ण भारतामध्ये जशी तोडा आणि राज्य कराची पॉलिसी ब्रिटिशांनी (Devide and Rule) वापरली तीच पॉलिसी त्यांनी मणिपूरमध्ये सुद्धा अमलात आणली.
मणिपूर का धुमसते आहे ? Manipur Violence in Marathi |
मणिपूरमध्ये जमिनीची वाटणी करून दोन्ही समाजासाठी निश्चित अशी जमीन सुद्धा देण्यात आली. मैतेई लोकांची संख्या जास्त असल्याने त्यांना ट्रायबल लोकांपेक्षा जास्त जमीन देण्यात आली, या मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रायबल लोकं हे एका जागी स्थायिक नव्हता प्रत्येक हंगामात वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित होत असल्याने त्यांनाही नवीन सिस्टीम मान्य नव्हती अशावेळी जमिनीच्या वाटणीवरून मैतेई (Meitei) आणि हिल्स ट्राइब पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्या.
नक्की वाचा -- अबब या देशात पडतो Fish Rain रहस्य जाणून व्हाल थक्क
इंग्रजांनी मणिपूर मध्ये लावलेली ही भांडण स्वतंत्र भारतातील राज्यकर्त्यांना सुद्धा मिटवता आली नाही उलट राज्यकर्त्यांनी हा संघर्षात पेटवून देण्याच काम केलं पहिली गोष्ट म्हणजे स्वातंत्र्यानंतर मणिपूरचा राजा भारतात सहभागी न होता मणिपूरचा स्वतंत्र देश असावा या बाजूचा होता मात्र तेव्हाच्या राजूकर्त्यांनी बरोबर खात्या दाखवत राजाला मणिपूर हे भारतात सामील करून घेण्यासाठी भाग पाडलं. पण त्याचवेळी मणिपूरला संपूर्ण राज्याचा दर्जा न देता केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलं त्यानंतर पुढची 25 वर्ष दिल्लीतल्या सरकारी अधिकाऱ्यांनी मणिपूरचा कारभार हाती घेतला. त्यामुळे मणिपूरच्या स्थानिक लोकांच्या कोणत्या मागण्यास राज्यातल्या जनतेला कसा कार्यभार होणे अपेक्षित आहे हे लक्षात घेतलं नाही त्यामुळे दोन्ही समाजातील संघर्षावर जे राजकीय समाधान करने आवश्यक होतं ते एवढ्या वर्षांमध्ये त्यांना मिळालं नव्हता.
मणिपूर हिंसाचाराची कारणे (What is the reason of Manipur violence?)
केंद्र सरकारने जेव्हा राज्याच्याअंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा हा प्रश्न अजूनच गुंता गुंतीचा होत गेला. पहिली गोष्ट म्हणजे मैतेई समाजाचे एसटी दर्जा सरकारने काढून घेतला. राज्यामध्ये मैतेई बहुसंख्या असल्याने त्यांना एसटी दर्जा देता येणार नाही असं सरकारचं म्हणणं पडलं. मैतेई समाजाला ट्रायबल एरियात म्हणजे कुकी (Kuki tribes) आणि नागा (Naga tribes) आदिवासींच्या भागांमध्ये जमीन घेण्यास देखील प्रतिबंध घातला गेला. त्यामुळे मैतेई समाजात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला.
दुसरी गोष्ट म्हणजे या दोन्ही समाजांची एकत्र येण्याची देशातल्या इतर समाजांसारखी मिळून मिसळून राहण्याची शक्यता पूर्णपणे बंद झाली. या सोबतच मणीपुरला इनर लाईन परमिट सिस्टीम मध्ये देखील आणलं गेलं नाही. इनर लाईन परमिट म्हणजे देशातल्या इतर राज्यातल्या लोकांना जर इनर लाईन परमिट (Inner Line Permit) असलेल्या राज्यात जायचं असेल तर त्यांना ते इनर लाईन परमिट घेऊन जावंच लागत मात्र मणिपूरमध्ये अशी सिस्टीम नसल्याने मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध स्थलांतर झालं त्यामध्ये कुकी (kuki tribe) आणि नागा (Naga) समाजाचे लोक हे सर्वाधिक्य आहेत असा मैतेई समाजाचा समज झाला आणि ट्राइब मैतेई यांच्यातला संघर्ष हा अगदी टोकावर पोहोचला.
नक्की वाचा -- भारतातील ११ रहस्यमयी मंदिरे (Top 11 Mysterious temples)
2019 मध्ये मणिपूर मध्ये इनर लाईन परमिट सिस्टीम (Inner Line Permit) आणण्यात आली आहे मात्र तोपर्यंत वेळ निघून गेल्याचं मैतेई (Meitei) समाजाचे म्हणन होतं स्वतंत्र राज्यांच्या मागणीने मणिपूरची परिस्थिती अजूनच बनली होती समाजाला भारत-बांगलादेश आणि म्यानमार मधील प्रदेश एकत्र करून स्वतंत्र कुकी लँड (kuki land) पाहिजे तर नागा समाजाला मणिपूर आसाम अरुणाचल प्रदेश आणि नागालँड (nagaland) चा नागा भूसंघ असलेल्या प्रदेश एकत्र करून स्वतंत्र नागलीम (Greater Nagalim) पाहिजे. मात्र यासाठी ज्या प्रदेशांवर धावा केला जातोय. ज्यावर मैतेई नागा आणि कुकी या तिन्ही समाजाचा दावा आहे त्यामुळे कुकी मैतेई (Meitei) संघर्षासारखंच कुकी (kuki tribe) आणि नागा (Naga) असा संघर्ष देखील अस्तित्वात आहे. आपआपल्या राज्यामध्ये तयारीला लागलेल्या या समाजांनी आपापल्या प्रदेशांमध्ये दुसऱ्या समाजाच्या लोकांना अनेक ठिकाणांवरून हटवायला सुरुवात केली.
1993 मध्ये नागा बंडखोरांनी त्यांनी दावा केलेल्या प्रदेशातील कुकींना हटवण्यासाठी 113 कुक्कीची हत्या केली होती. सातत्याने होणाऱ्या अशा संघर्षामुळे या तिन्ही समाजाच्या स्वतःच्या अशा सशस्त्र अशा संघटना देखील आहेत आणि या संघर्षाच्या या संघटनांनी मांडलेला उच्छाद हा हिंसाचार (Manipur Violence in Marathi) वाढवण्याचं महत्त्वाचं कारण आहे. या संघटनांची फंडिंग त्यासाठी नागरिकांकडून जमा केला जाणारा पैसा अत्याधुनिक शस्त्रास्त्र अशी या बंडखोर संघटनाची प्रोफाईल सिस्टीम सुद्धा तयार आहे. मणिपूरच्या ऐतिहासिक कारणांमुळेच राज्यात कशी स्फोटक परिस्थिती झाली हे आपण पाहिलं आणि या स्फोटक परिस्थितीला ठिणगी देण्याचं काम तिथले राजकारणी लोक करतात.
नक्की वाचा -- The Founder -प्रेरणादायी Movie review in marathi
पुढच्या विधानसभेत साठ जागा आहे यापैकी 40 जागा या मैतेई बहूसंख्या असलेल्या भागात आहेत. त्यामुळे राज्यामध्ये बहुसंख्य वेळा मुख्यमंत्री हा मैतेई समाजाचा असतो आणि मैतेई समाजाचा मुख्यमंत्री हा ट्रायबल समाजाच्या विरोधात निर्णय घेतो, धोरण आखतो असा ट्रायबल (Trible) लोकांचा आरोप आहे. सध्याच्या हिंसाचाराला (Manipur Violence) सुद्धा हेच तत्कालीन कारण ठरले. मणिपूरच्या सध्याचे मुख्यमंत्री येन वीरेंद्र सिंग (N. Biren Singh) हे मैतेई समाजाचे नेते आहेत. त्यांच्या सरकारच्या काळामध्ये दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
एक म्हणजे मणिपूरच्या हिल्स (manipur hills area) मध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची शेती होते असं समोर आलं होतं विशेषतः जंगलांच्या जमिनीवरती अतिक्रमण करून ही शेती करण्यात येते असं समोर आलेले त्यामुळे सरकारने मग जे जमिनीवरती अतिक्रमण होतं ते काढायला सुरुवात केली मात्र यामुळे हिल्स मध्ये राहणारे कुकी समाजाचे लोक विस्थापित व्हायला लागले त्यामुळे मैतेई (meitei) समाजाचे मुख्यमंत्री हे मुद्दाम कुकी (kuki) समाजाला हटवत आहेत अशी भावना कुकी (kuki tribe) समाजात निर्माण झाली यासोबतच न्यायालयाच्या आदेशाने मैतेई समाजाला एसटी दर्जा (Scheduled Tribe- ST) देण्याचा निर्णय मणिपूर सरकारने (manipur government) घेतला मात्र अन्याय विरोधात मोठ्या प्रमाणात कुकी समाज रस्त्यावर उतरला (Manipur Violence in Marathi.)
नक्की वाचा -- भारतीय घोटाळेबाज लंडनला का पळून जातात?
मैतेई (Meitei) समाजाला एसटीतून आरक्षण दिलं तर तो समाज मोठ्या प्रमाणात आमचे अधिकार बळकावेल कुकींच्या जमिनी ताब्यात घेतील अशी असुरक्षिततेची भावना या आदिवासी समाजात निर्माण झाली त्यामुळे मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाने एकत्र यायला सुरुवात केली. रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात आंदोलन व्हायला लागली तर एसटी दर्जासाठी मैतेई समाज (Meitei) हा रस्त्यावर उतरला आणि हिंसाचार करायला सुरुवात झाली(Manipur Violence in Marathi). गेल्या पाच सहा महिन्यांपासून मणिपूरचा (Manipur Violence) हा हिंसाचार थांबत नाहीये आणि थांबण्याच नाव ही घेत नाही.
मणिपूर का धुमसते आहे Manipur Violence in Marathi ? मणिपूर हिंसाचाराची कारणे, इतिहास (History of Manipur),भौगोलिक रचना (Geographical Structure of Manipur) बाबत माहिती लेखातून घेतली.(Manipur Violence in Marathi) आपण या हिंसाचाराला कारणीभूत असणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक घटनांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला (What is the reason of Manipur violence?) तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोचक माहितीसाठी जोशमराठी संकेतस्थळावरील लेख तुमच्या प्रियजणांशी शेयर करायला विसरू नका.
टिप्पणी पोस्ट करा