नमस्कार मंडळी ,नद्या ह्या नेहमीच मानवाच्या जीवनाचे स्त्रोत राहिल्या आहेत. नद्या हा निसर्गाचा अविभाज्य भाग आहे, पृथ्वीवर जीवन केवळ नद्यांमुळेच शक्य आहे, जीवन जगण्यासाठी सर्वात महत्त्वाचा स्त्रोत म्हणजे पाणी, जे नद्यांमधूनच मिळते. नद्या त्यांच्यासोबत पावसाचे पाणी गोळा करून ते जमिनीत वाहून नेण्याचे महत्त्वाचे काम करतात.आर्थिक विकास असो, सामाजिक विकास असो किंवा धार्मिक विकास असो, देशाच्या विकासात नद्या खूप मदत करतात. नदीचे एक नाही तर अनेक फायदे आहेत. नद्या पृथ्वीवर जीवन जगण्यासाठी वरदान आहेत.(Longest rivers in the world in Marathi)
या लेखातून आपण जगातील सर्वात लांब दहा नद्या ( Worlds Longest Rivers in Marathi), नद्यांचे महत्त्व (Importance of Rivers in Marathi), भारतातील नद्यांचे धार्मिक महत्त्व (Religious Importance of Rivers in India) याबाबत माहिती घेनार आहोत.
जगातील लांब दहा नद्या (Longest rivers in the world in Marathi) |
मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल की भारतातील सर्वात मोठी नदी ही गंगा नदी आहे पण आश्चर्याची बाब म्हणजे जगातील सर्वात मोठ्या दहा नद्यांमध्ये गंगा या नदीचे नाव येत नाही. तर मग अशा या दहा महाकाय नद्या व त्यांचे वैशिट्य आहेत तरी काय हे या लेखातून पाहुयात.
नद्यांचे महत्त्व (Importance of Rivers in Marathi )
नद्या सामाजिक, आर्थिक, वैज्ञानिक आणि इतर अनेक मार्गांनी उपयुक्त मानल्या जातात. नद्या आपल्याला पाण्याबरोबरच शुद्ध वातावरणही देतात. याशिवाय शेतांना सिंचनासाठी पाणी, पिण्यासाठी शुद्ध पाणी, उदरनिर्वाहासाठी मत्स्यपालन रोजगार आणि इतर अनेक रोजगार नद्यांमधून मिळतात.
नक्की वाचा -- भारतातील ११ रहस्यमयी मंदिरे (Top 11 Mysterious temples)
काही नैसर्गिक आपत्ती जसे की पाण्याची कमतरता, दीर्घकाळ पाऊस न पडणे, अशा अनेक समस्या निर्माण होतात. उदाहरणार्थ, जेव्हा पाण्याचे दुर्भिक्ष असते तेव्हा प्यायला पाणी नसते आणि कष्टाने पिकवलेली पिकेही पाण्याअभावी नष्ट होतात. अशा परिस्थितीत फक्त सहारा नदी उरते.
भारतातील नद्यांचे धार्मिक महत्त्व (Religious Importance of Rivers in India)
भारतात नद्यांची माता म्हणून पूजा केली जाते, भारतातील नद्यांचा धार्मिक इतिहास अतिशय रोमांचक आहे. प्राचीन काळापासून भारत हा नद्यांचा देश म्हणून साजरा केला जातो, पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची प्रथा भारतात नेहमीच चालत आली आहे.
नक्की वाचा -- अबब या देशात पडतो Fish Rain रहस्य जाणून व्हाल थक्क
भारतातील पवित्र नद्यांच्या काठावर बसून सर्व ऋषीमुनींनी ज्ञान प्राप्त केले आहे. असे मानले जाते की भारतातील प्रमुख संस्कृतींपैकी एक, हडप्पा आणि सिंधू संस्कृती देखील नद्यांच्या काठावर विकसित झाली.भारतातील काही गंगा, यमुना, सिंधू, ब्रह्मपुत्रा, घाघरा नदी, गंडक, कोसी, सरस्वती, कृष्णा, कावेरी, सरयू इ. प्रमुख पवित्र नद्या म्हणून ओळखल्या जातात.
जगातील 10 सर्वात लांब नद्यांची यादी (List of Longest Rivers in the World)
नदी क्र. | नदीचे नाव | नदीचे प्रमुख स्थान | नदीची लांबी (किमी) | नदीची लांबी (मील) |
---|---|---|---|---|
१ | नाईल नदी (Nile River) | अफ्रीका | 6650 | 4130 |
२ | ॲमेझॉन नदी (Amazon River) | दक्षिण अमेरिका | 6400 | 4086 |
३ | यांगतझी नदी (Yangtze River) | चीन | 6300 | 3917 |
४ | मिसिसिपी नदी (Mississippi River) | अमेरिका | 6275 | 3902 |
५ | येनिस नदी (Yenisei River) | रशिया | 5539 | 3445 |
६ | येलो नदी (Yellow River) | चीन | 5464 | 3398 |
७ | ओब नदी (OB lrtysh River) | रशिया | 5410 | 3364 |
८ | पराना नदी (Parana River) | उरुग्वे | 4880 | 3030 |
९ | कांगो नदी (Congo River) | अफ्रीका | 4700 | 2922 |
१० | कामा नदी (Amur River) | आशिया | 4480 | 2800 |
जगातील सर्वात लांब दहा नद्या व त्यांची वैशिष्ट्ये (Longest Rivers in the World in Marathi)
1) नाईल नदी (Nile River):
जगातील सर्वात मोठी नदी म्हणून आफ्रिकेत नाईल या नदीला ओळखले जाते या नदीची एकूण लांबी 6853 किलोमीटर एवढी आहे नाईल नदीच्या शेजारील क्षेत्र शेतीसाठी पूरक असल्या कारणाने दक्षिण आफ्रिकेतील लोक शेती करतात यामधून दरवर्षी लाखो लोक चांगल्या प्रकारची शेती करतात. नाईल नदी ही इजिप्त, युगांडा, इथिओपिया, केनिया, टांझानिया, रवांडा, काँगो, इरिट्रिया, बुरुंडी, सुदान आणि दक्षिण सुदान या देशांमधून वाहते.
जगातील लांब दहा नद्या (Longest rivers in the world in Marathi) |
2) ॲमेझॉन नदी (Amazon River):
ॲमेझॉन नदी दक्षिण अमेरिकेमध्ये असणाऱ्या ॲमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात लांब नदी आहे या नदीची एकूण लांबी नदीची एकूण लांबी 6,400 किलोमीटर एवढी आहे जी नाईन नदीहून थोडीशी छोटी आहे जगात ही नदी दुसऱ्या नंबर वर असली तरी पाण्याच्या घनतेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर येते.
3) यांगतझी नदी (Yangtze River) :
यांगतझी नदी चीन मधून वाहणारी नदी ही आशिया खंडातील सर्वात मोठी नदी आहे तसेच जगातील तिसऱ्या क्रमांकाची नदी आहे या नदीची एकूण लांबी 6300 किलोमीटर एवढे आहे चीन सरकारने दोन भागांना जोडण्यासाठी या नदीच्या आरपार मेट्रो लाईनचे जाळे टाकलेले आहे. यांगतझी या नदीला चीनमध्ये जियांग ही म्हटले जाते. या नदीचा बहुतांश जलप्रवाह चीनमध्ये आहे.
नक्की वाचा -- सेंगोल म्हणजे काय ? What is Sengol in Marathi
4) मिसिसिपी नदी (Mississippi River):
मीसीसीपी नदी लांबीच्या बाबतीत अमेरिकेतील सर्वात मोठी नदी आहे तसेच जगातील चौथ्या नंबरची नदी ही आहे त्या नदीची एकूण लांबी 6275 किलोमीटर एवढी आहे. मीसीसीपी नदी फक्त अमेरिकेतच वाहते तसेच या नदीला पूर्व आणि पश्चिम सीमारेखा मानले जाते. मिसिसिपीची प्रमुख उपनदी जेफरसन नदी आहे.
5) येनिस नदी (Yenisei River):
येनिस नदी ही जगातील सर्वात मोठी पाचवी नदी आहे ही नदी रशिया आणि मंगोलिया मध्ये वाहते येनिस या नदीची एकूण लांबी 5339 किलोमीटर एवढी आहे. तीन नद्यांच्या संगमाने येनिस ही नदी तयार होते येनिस या नदीचा उगम मंगोलियातल्या मध्य भागात होतो. येनिसे नदी हि आर्कटिक महासागराला जाऊन मिळणारी नदी सुद्धा म्हंटले जाते.
6) येलो नदी (Yellow River):
चीनमध्ये वाहणाऱ्या या नदीला वांग नदीच्या नावाने सुद्धा ओळखले जाते या नदीची एकूण लांबी 5464 किलोमीटर एवढी आहे. या नदीच्या पिवळ्या रंगामुळे ती पिवळी नदी म्हणून ओळखली जाते. नदी चीनमधील दुसरी सर्वात मोठी नदी आहे ही नदी भारताच्या आसाम मधून वाहते व पुढे तिबेट आणि बांगलादेशमध्ये वाहत जाते. या नदीचा जास्तीत जास्त भाग चीनमध्येच वाहतो.
नक्की वाचा -- म्युच्युअल फंड म्हणजे काय ? त्याचे प्रकार ? What is Mutual Funds in Marathi.
7) ओब नदी (OB lrtysh River):
ओब नदी ही प्रामुख्याने रशिया आणि पश्चिम सायबेरिया या क्षेत्रात वाहते या नदीची एकूण लांबी 5410 किलोमीटर एवढी आहे ओब नदीच्या पाण्याचा वापर सिंचन वीज मासेमारी आणि पेयजल योजनासाठी केला जातो ही नदी जगातील सर्वात लांब नदीमध्ये सातव्या क्रमांकावर येते.
8) पराना नदी (Parana River):
पराना नदी खीर दक्षिण अमेरिकेत वाहणारी मुख्य नदी आहे दक्षिण अमेरिकेत वाहणाऱ्या नद्यांमध्ये ॲमेझॉन नदीनंतर ही दुसरी सर्वात मोठी नदी आहे पाराना नदीचा अर्थ समुद्रासारखी विशाल असा होतो पराना ही नदी ब्राझील पॅराग्वे आणि अर्जंतीना मधून वाहते या नदीचा अंतिम प्रवाह "रियो दे ला प्लाटा" मध्ये आहे. ही नदी 4880 किलोमीटर एवढी आहे.
9) कांगो नदी (Congo River):
कांगो नदी ही जगातील सर्वात लांब नद्यांमध्ये नव्या क्रमांकावर येते ही नदी दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे व या नदीला जेरे नदी सुद्धा म्हणतात दक्षिण आफ्रिकेतील नील नदीनंतर ही दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे कांगो नदी ही 4700 किलोमीटर एवढी लांब आहे तसेच ही नदी 230 मीटर सहज जगातील सर्वात खोल नदी मानली जाते.
नक्की वाचा -- मणिपूर का धुमसते आहे ? Manipur Violence in Marathi
10) कामा नदी (Amur River):
अमुर नदी अमुर नदी ही जगातील सर्वात लांब नदीमध्ये दहाव्या क्रमांकावर येते या नदीची एकूण लांबी 4444 किलोमीटर एवढी आहे अमुर या नदीने रशिया आणि चीनमध्ये 4480 किलोमीटर एवढी हद्द बनवलेली आहे 17 व्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंत रशिया आणि चीनमध्ये याच नदीच्या जमिनीवरून वाद झाले तसेच चीनमध्ये या नदीला ब्लॅक ड्रॅगन असेही म्हटले जाते.
जगात अशा अनेक नद्या आहेत ज्या एका देशातून दुसऱ्या देशात जातात, ज्यामुळे लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी तर मिळतेच, पण लोकांना पैसे कमवण्याची संधीही मिळते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना जगातील 10 मोठ्या नद्यांबद्दल माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे कारण अनेकदा स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना टॉप 10 नद्यांबाबत अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात. रेल्वे, एसएससी, यूपीएससी, चालू घडामोडी आणि सामान्य जागरूकता यासारख्या परीक्षांमध्ये नद्यांशी संबंधित प्रश्न विचारले जातात.
या लेखातून आपण जगातील सर्वात लांब दहा नद्या (Longest Rivers in the World in Marathi), नद्यांचे महत्त्व (Importance of Rivers in Marathi), भारतातील नद्यांचे धार्मिक महत्त्व (Religious Importance of Rivers in India) याबाबत माहिती घेतली.
मित्रांनो आम्ही सांगितलेल्या दहा नद्या पैकी कोणत्या नदीची माहिती तुम्हाला सर्वात जास्त आवडली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा जर हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या प्रिय जणांशी शेयर करू शकता. जोशमराठी नेहमीच्या रोचक माहिती वाचकांसाठी पुरवत असते.
टिप्पणी पोस्ट करा