MPSC राज्यसेवा Interview ची तयारी व मार्गदर्शन (Guidance)

मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही MPSC Prelims व MPSC Mains Exam दिली असेल , आता तुम्हाला थोड आराम करायच आहे , तुम्ही दिलेल्या एमपीएससी मेन्स परीक्षेबाबत किती मार्क्स मिळतील याचा अंदाज लावणे टाळायचे आहे. या काळात तुम्हाला सकारात्मक राहणे गरजेचे आहे. MPSC Interview ची तयारी (Preparation) करताना काही गोष्टींचे पालन करणे मुलाखतीच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहे.

MPSC राज्यसेवा स्पर्धा परीक्षेच्या या भागात आपण MPSC Mains Exam पात्र ठरल्यावर कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत ?, MPSC स्पर्धा परीक्षा मुलाखतीची तयारी कशी कराल ? (How to prepare for MPSC Competitive Exam Interview ?) व MPSC Spardha pariksha Guidance (मार्गदर्शन) पाहणार आहोत. मित्रानो हा लेख पूर्ण शेवट पर्यंत पहा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

MPSC राज्यसेवा Interview ची तयारी व मार्गदर्शन (Guidance)
MPSC राज्यसेवा Interview ची तयारी व मार्गदर्शन (Guidance)

प्रिलिम्स (MPSC Prelims) व मेन्स परीक्षा (MPSC Mains) पात्रता घेतल्यानंतर, प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही उमेदवार मुलाखतीस सामोरे जाण्यास पात्र ठरतात. खरे म्हणायचे तर मुलाखत ही एकंदर व्यक्तिमत्व चाचणी (Personality Test) आहे. राज्य सेवांमध्ये करिअरसाठी (Rajyaseva career) उमेदवाराची योग्यता तपासणे हेच मुलाखतीचे मुख्य उद्दीष्ट असते. मुलाखती सक्षम व निःपक्षपाती निरीक्षक मंडळाद्वारे घेतल्या जातात. शैक्षणिक अभ्यासाखेरीज व्यक्तिमत्त्व चाचणीमध्ये उमेदवारांना त्यांच्या राज्याच्या सद्यस्थितीविषयी माहिती असणे आवश्यक आहे. उमेदवारांच्या उत्तरांनुसार अंतिम निवड करण्यात येते.

हे नक्की वाचा : MPSC Exam म्हणजे काय ? पात्रता (MPSC Exam Eligibility) ?

एमपीएससी निकाल (MPSC Result) अधिकृत साइटवर घोषित करते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रत्यक्षात तीन निवड टप्प्यांची पूर्तता केल्यानंतर शॉर्ट-लिस्टेड अर्जदारांची अंतिम यादी प्रकाशित करतो. मुख्य परीक्षेतील मुलाखती आणि मुलाखती विचारात घेतल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. तथापि, मागील वर्षांतील कटऑफचे विश्लेषण करून एखाद्याचा परिणाम अंदाज आपण ठरवू शकतो.

प्रिलिम्स व मेन्स परीक्षा पात्र ठरल्यानंतर उमेदवारांनी खालील गोष्टी लक्षपूर्वक जाणून घ्याव्यात .

१) उमेदवाराची मुलाखत एका मंडळामार्फत घेतली जाते, ज्याच्याकडे उमेदवाराच्या कारकीर्दीची नोंद असेल आणि उमेदवाराने अर्ज भरलेल्या इच्छेसंबंधांची नोंद केली असेल.

२) सक्षम आणि निःपक्षपाती पर्यवेक्षक मंडळामार्फत राज्य सेवेतील करिअरसाठी उमेदवाराची वैयक्तिक योग्यता तपासणे हे मुलाखतीचे उद्दीष्ट असते .

३) व्यक्तिमत्त्व चाचणीमध्ये, त्यांच्या शैक्षणिक अभ्यासाव्यतिरिक्त, उमेदवारांना त्यांच्या राज्यात आणि बाहेरील घडामोडींची माहिती असणे आवश्यक आहे.

४) मुलाखत हे उद्दीष्टात्मक संभाषण आहे ज्याचा हेतू उमेदवाराचे मानसिक गुण आणि विश्लेषणात्मक क्षमतेचा तपास करण्यासाठी आहे.

MPSC स्पर्धा परीक्षा मुलाखतीची तयारी कशी कराल ? (How to prepare for MPSC Competitive Exam Interview ?)


१) उमेदवारांनी तांत्रिक विषयांकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे . (Pay Attention to Technical Subjects)

तांत्रिक विषयांकडे लक्ष देणे आणि त्याबद्दल शंका निर्माण करणे विद्यार्थ्यांना लाभकारक ठरते तसेच प्रत्येक प्रकरण तपशीलवार शिकण्यास मदत करते आणि बहुतेक विषय आपल्या पदवीच्या वर्षामध्ये सहजपणे शिकवले - कव्हर केले जाऊ शकतात.

२) वेळेचे नियोजन (Time Managing)

वेळ व्यवस्थापन (Time Management) करणे आणि सर्व विषयांचे योग्य वेळापत्रक तयार करून त्याचे अनुकरण करणे फार महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांकडे बहुतेकदा या धोरणाकडे दुर्लक्ष करणे आणि यादृच्छिकदृष्ट्या अभ्यासाकडे जाण्याचा कल असतो, ज्याचा शेवट हा परिणामी अपूर्ण कामे राहतात. प्राधान्यक्रमानुसार वेळ वाटल्यास अभ्यासक्रम वेळेवर तसेच योग्य क्रमवारीत कव्हर करण्यास मदत होते.

३) वाचनाची आवड निर्माण केली पाहिजे (Develop a Reading Habit)

अनेक आयईएस (IES) पात्रताधारकांसाठी वाचनाची सवय वरदान ठरली आहे. वर्तमानपत्र वाचणे शब्दसंग्रह वाढवते आणि आपले सामान्य ज्ञान (General knowledge) देखील बळकट करते. आजकाल बर्‍याच ऑनलाईन इंग्रजी तसेच मराठी शिकवण्या आहेत तसेच, अधिक समजून घेण्यासाठी असे अनेक वर्ग आहेत ज्यात सामील होऊन तुम्ही तुमचे सामान्य ज्ञान वाढवू शकता. वाचनाची सवय लावा आणि या मुलाखती आपल्याला उत्तीर्ण करण्यास खूप मदत होईल. तसेच, आपल्या संप्रेषण कौशल्यांवर (Communication Skill), तोंडी आणि लेखी दोन्ही काम करणे फार आवश्यक आहे.

४) एमपीएससीच्या मागील वर्षाच्या पेपर्सचे निराकरण करा. (Solve MPSC's Previous Year's Papers)

सराव करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे प्रश्नपत्रिका (MPSC Question Papers) सोडवणे. मागील वर्षांचे पेपर सोडविण्यामुळे परीक्षेचे स्तर आणि आपल्या तयारीची पातळी जाणून घेण्यास मदत होतेच शिवाय आपल्या मनामध्ये आत्मविश्वास हि निर्माण होतो . दिलेल्या निर्धारित वेळेत पेपर सोडविण्यामुळे वेळेची अकार्यक्षमता व्यवस्थापित करण्यास देखील मदत होते. पेपर सोडविल्यानंतर एखाद्या चुकांचे विश्लेषण करणे अभ्यासक्रम वाचण्याइतकेच महत्वाचे आहे.स्वतःमधील कमकुवत पैलू शोधण्यात मदत करते आणि त्यानुसार कमकुवत अध्याय सुधारण्याचे काम करता येते.

५) परीक्षेच्या नमुन्या (MPSC Exam Patten) नुसार तयारी करत राहा.

आयईएस (IES) परीक्षेत उद्दीष्टे (Objective) तसेच सब्जेक्टिव्ह (Subjective) दोन्ही असतात. या दोन्ही विभागाच्या तयारीसाठी वापरलेली रणनीती वेगवेगळी आहे. तथापि, व्यवस्थापनाच्या दोन्ही वेळी काही कौशल्यांची आवश्यकता असते. दोन्ही टप्प्यात पात्र ठरल्यानंतर तिसरा टप्पा म्हणजे मुलाखत (MPSC Interview) फेरी. या फेरीमध्ये आपल्या एकूण व्यक्तिमत्त्वाचा (Personality) विचार केला जातो. एक जबाबदार नेता होण्याच्या क्षमतेची चाचणी केली जाते. त्या पोस्टसाठी तुम्ही किती सुज्ञान आहात याचे निरीक्षण केले जाते.

MPSC Spardha pariksha Guidance (मार्गदर्शन)

तुम्ही मुख्य परीक्षेसाठी (MPSC Mains Exam) खूप अभ्यास केला आहात त्यामुळे स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी ,तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींसाठी थोडा वेळ द्यायला हवा, तसेच आराम करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा , अजून आपण MPSC चे शिखर गाठलेले नाही. राज्यसेवेतील मुलाखत (MPSC Interview) हा अंतिम आणि निर्णायक टप्पा आहे . आपला सभोवतालच्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, वैचारिक पातळी, आपल्या सोबत घडणाऱ्या दैनंदिन घटनांवर आपण कसे प्रतिक्रिया देतो, स्वतःविषयी, आपल्या आवडी निवडी काय आहेत हे जाणून घेणे मुलाखतीच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे.

१) मला मुलाखतीचा बोलावणे येणार नाही कारण मला कमी मार्क्स मिळाले आहेत अशा प्रकारच्या निगेटिव्ह गोष्टी मनातून काढून टाका, या अशा निगेटिव्ह गोष्टींमुळे खूप जणांनी केवळ क्षुल्लक मार्कांनी पोस्ट गमावल्या आहेत ,जेथे क्लास-1 मिळण्याची शक्यता होती तिथे त्यांना क्लास-2 वर त्यांना समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे या काळात नेहमी पॉसिटीव्ह गोष्टींकडे लक्ष्य द्या.

२) मुख्य परीक्षेतील (MPSC Mains Exam) मार्क्स तुम्ही मुलाखतीला पात्र (MPSC Interview Eligibility) आहे कि नाही हे ठरवेल पण तुम्ही दिलेल्या मुलाखतीवरून क्लास-1 होणार की क्लास-2 हे ठरेल.

३) तुमच्या ज्या मित्रांनी मुख्य परीक्षा (MPSC Mains Exam) दिली आहे त्यांच्या संपर्कात राहा.

४) मुलाखतीचे अगदी बारीक महत्वाचे पॉईंट्स जाणून घेण्यासाठी YouTube वरील मागील वर्षातील घेतले गेलेल्या मुलाखती (MPSC interviews) पाहा. त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि त्या दृष्टीने तयारी कराल. मुलाखतीसाठी पुस्तके घ्यायची असतील तर आनंद पाटील यांचे मुलाखतीसाठीचे पुस्तक तसेच ज्ञानदीप अकादमीचे कैलास आंडील (तहसिलदार) संकलित मुलाखतीची तयारी हि पुस्तके घ्यावीत.

५) स्वतःविषयीची माहिती (biodata) तुमचे छंद आणि जिल्ह्याची संपूर्ण माहिती ज्यामध्ये तुमच्या जिल्ह्याच्या काही प्रमुख समस्या त्यावर उत्तरे. तुमची शाळा /महाविद्यालय बाबतची माहिती, तुमच्या महाविद्यालयाच्या नावात महापुरुषांचे नाव असेल तर त्यांचे समाजातील कार्य, सध्याचे पदाधिकारी, माजी प्रसिद्ध विद्यार्थी , संस्थेचे कार्य, घरचा मुख्य व्यवसाय, शेती असेल तर त्याचा तपशील, उत्पादन खर्च, शेतीतून मिळणारे उत्पन्न, तुमच्या शेतीतील किंवा गावातील घेतली जाणारी प्रमुख पिके, दुष्काळ, तुमच्या गावचे, जिल्ह्याचे सामाजिक, ऐतिहासिक, भौगोलिक स्थान,राजकीय महत्व यांची बारीक माहिती असणे गरजेचे ठरते. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व त्यांच्या पोस्ट बाबतची माहिती. जिल्ह्याची एक अधिकृत वेबसाईट असते तिचा वापर करून तुम्ही वरील माहिती मिळवू शकता.

६) आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे चालू घडामोडी (Current Affairs). चालू घडामोडींवर सकारात्मक, नकारात्मक आणि संविधानात्मक बाजूने टिपा कडून ठेवा. जुन्या वर्तमान पत्रातील तुमच्या भागातील महत्वाच्या समस्या काय होत्या व त्याबाबतीत तुमचे मत यावर नोंदी काढून ठेवा. 

हे नक्की वाचा : MPSC अभ्यासक्रम (Syllabus-Prelims-Mains) | Spardha pariksha

७) मुलाखतीला तुम्ही पोस्ट साठीचे प्राधान्य (Preferences) भरून द्यावा लागतो ,ज्या मध्ये तुमचा कल आहे तो खूप काळजी पूर्वक ठरवणे गरजेचे आहे.

८) तुम्ही प्रत्येक पदाची कार्ये कर्तव्ये जबाबदाऱ्या माहिती करून घ्या आणि आपली आवड पाहून Preferences भरा.

९) तुम्हाला वर सांगितल्या प्रमाणे मित्रांचा समूह बनवला असेल तर प्रत्येक पदावर कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष त्याच्या कामाच्या ठिकाणी जाऊन भेटून माहिती घेणे मुलाखतीच्या दृष्टीने फायदेशीर आहे.

१०) तुम्ही जर नोकरी (Job) करत असाल तर तुमच्या कामाबद्दल पुरेपूर माहिती गोळा करा.

११) तसेच जर तुम्ही नोकरी करत नसाल तर तुमच्या पदवीचे विषय, त्या बाबतीत विविध संकल्पना, आताची परिस्तिथी, एवढ्या काळात आपण काय केले. या प्रश्नांचे उत्तर सकारण तयार ठेवा .

१२) नेहमी बोलत रहा, पडणाऱ्या प्रश्नांबाबत व्यक्त होत राहा , आरश्यासमोर बसा व काढलेल्या नोंदी मोठ्याने वाचा.

१३) TV वरील विविध वादसंवाद , चर्चा पहा. त्यामुळे चालू घडामोडी (Current Affairs) समजतील तसेच वर्तमान पत्र (News Paper) देखील वाचावीत.

१४) बॉडी लँग्वेज (Body language), चालणे व बोलणे , व्यक्तिमत्व सुधारा, व्यायाम करा.

१५) याकाळात निगेटिव्ह गोष्टी टाळा नेहमी सकारात्मक गोष्टींचा विचार करा. नेगेटिव्ह बोलणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात जाणे टाळा.

खालील दिलेला विडिओ तुमच्यासाठी नक्कीच लाभकारक ठरेल :

मंडळी तर तुम्ही आता वरील सर्व गोष्टी पाहिल्यात जसे MPSC Interview Guidance . त्या गोष्टी तुम्ही अंमलात आणाल अशी आम्ही अशा करतो. शक्यतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपल्याला न डगमगता MPSC स्पर्धा परीक्षाचे शिखर पार करायचे आहे आणि तुम्ही ते पार कराल असे आम्हांस वाटते. तर मित्रानो प्रेरणेने व सकारात्मक विचारांनी स्वतःला चार्ज करा , खूपखूप अभ्यास करा व अधिकारी व्हा . तुम्हाला joshmarathi.com कडून खूप साऱ्या शुभेच्या.

मित्रांनो हा लेख तुम्हाला कसा वाटला व त्याबाबतीत काही शंका असतील तर कॉमेंट करून सांगायला विसरू नका , तुमचा अभिप्राय आमच्यासाठी फार महत्वाचा असतो. त्यामुळेच आम्हाला लेख लिहिण्यास प्रेरणा मिळते. हा लेख तुम्ही तुमच्या प्रिय जणांशी नक्की शेयर करा , जेणेकरून सर्वाना याचा फायदा होईल . धन्यवाद.. !


🔅 खालील लेख MPSC स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचे आहेत :

👉 नक्की वाचा >> MPSC Exam म्हणजे काय ? पात्रता (MPSC Exam Eligibility) ? || Spardha Pariksha

👉 नक्की वाचा >> MPSC अभ्यासक्रम (Syllabus-Prelims-Mains) | Spardha pariksha

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने