MPSC Exam म्हणजे काय ? पात्रता (MPSC Exam Eligibility) ? || Spardha Pariksha

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो , MPSC Exam म्हणजे काय ? त्या परीक्षेची पात्रता कोणती आहे ? कोणकोणत्या परीक्षा एमपीएससी आयोजित करते ? MPSC Exam कोण देऊ शकतो (who is eligible for MPSC exam) ? असे खूप सारे प्रश्न तुम्हाला पडत असतील. तसेच काही अडचणी हि असतील एमपीएससी फॉर्म भरताना लागणारी आवश्यक कागदपत्रे (What  you will need before filling MPSC Form ?) , फॉर्म कसा भरावा (How to fill MPSC Form ?) तसेच Profile कशी बनवावी (Profile Creation) या संबंधित सविस्तर माहिती या लेखातून तुम्हाला मिळणार आहे. हि पोस्ट तुम्ही शेवट पर्यंत वाचाल तरच तुम्हाला नक्की फायदा त्याचा होईल याची खात्री www.joshmarathi.com तुम्हाला देत आहे. 

MPSC Exam म्हणजे काय ? पात्रता (MPSC Exam Eligibility) ? || Spardha Pariksha-जोशमराठी
MPSC Exam म्हणजे काय ? पात्रता (MPSC Exam Eligibility) ? || Spardha Pariksha-जोशमराठी

आज प्रत्येकाला त्यांचे भविष्य संरक्षित करायचे आहे कारण आयुष्य हे अनिश्चिततेने परिपूर्ण आहे . बर्‍याच लोकांना नियमित कालांतराने उत्पन्नाचा सततचा प्रवाह आणि उत्पन्न वाढीसह आपल्या जीवनात स्थायिक होऊ इच्छित आहेत . आजच्या तरुणांसाठी खासगी क्षेत्राने उज्ज्वल भविष्याची शक्यता निर्माण केली असली तरी नोकरीची असुरक्षितता अजूनही कायम आहे. यामुळे, आपल्याला कठोर परिश्रम घ्यावे लागतात कारण आपल्या सर्वांना माहित आहे की खाजगी कंपन्या जास्त वेळ काम करतात. आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर, आपल्यापैकी बरेचजण या जीवनाचे क्षेत्र कबूल करतात आणि खासगी क्षेत्रात नोकरी पत्करतात.

बरेच लोक असे आहेत जे स्मार्ट नोकरी करतात आणि सरकारी नोकर्‍या निवडतात. सरकारी नोकरीमध्ये कामाचे तास निश्चित केले गेले आहेत आणि त्याशिवाय कर्मचार्‍यांना भरपूर सुविधा आणि लवचिकता दिली आहे हे कधीच लपून राहिले नाही. भारत जगातील सातव्या क्रमांकाचा देश असून , भारतामध्ये २९ राज्यांचा समावेश आहे, जे संयुक्तपणे सरकारी नोकऱ्यांची भरभराट करतात.

वेगवेगळ्या नागरी सेवा परीक्षा (civil service examinations) दरवर्षी घेतल्या जातात. या सर्व परीक्षांपैकी काही राज्यस्तरावर तर काही राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जातात. राज्यस्तरीय सेवा परीक्षांमध्ये एमपीएससी परीक्षा (MPSC – Maharashtra Public Service Commission) ही भारतातील प्रमुख नागरी सेवा परीक्षांपैकी (premier civil services exams) एक आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी (MPSC – Maharashtra Public Service Commission). भारतीय राज्यघटनेने बनविलेली, एमपीएससी ही एक संस्था आहे जी महाराष्ट्र राज्यातील नागरी सेवेसाठी निवडलेल्या उमेदवारांची निवड करते. दरवर्षी महाराष्ट्र शासन एमपीएससी परीक्षा घेते ज्याद्वारे ते प्रशासन (Administration) , पोलिस (Police), वन (Forest) आणि अभियांत्रिकी (Engineering) अशा विविध विभागांतर्गत नोकरीसाठी पात्र उमेदवारांची निवड करतात.

महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC – Maharashtra Public Service Commission) उपजिल्हाधिकारी (Deputy Collector), तहसीलदार (Tehsildar), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Deputy Chief Executive Officer), पोलीस उपाधीक्षक (Deputy Superintendent of Police), नायब तहसीलदार (Deputy Tehsildar), कक्ष अधिकारी व  तत्सम राजपत्रित गट 'अ ' व  ' ब ' या पदांसाठी परीक्षा घेण्यात येतात , त्यालाच राज्यसेवा परीक्षा (State Service Examination) असे म्हणतात.  भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 नुसार ‘ महाराष्ट्र लोक सेवा आयोग ’ निर्माण केला असून घटनेच्या कलम 320 नुसार सेवकभरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे कार्य आयोगातर्फे होते. महाराष्ट्रामध्ये ‘ महाराष्ट्र लोक सेवा आयोग’ १ मे १९६० रोजी स्थापन करण्यात आला.

दरवर्षी, एमपीएससी (MPSC) विविध सरकारी सेवांमध्ये (government services) वर्ग I , II आणि III च्या अधिकाऱ्यांसाठी 15 परीक्षा घेते.

कोणत्या परीक्षा एमपीएससी (MPSC) आयोजित करते ?

केंद्र सरकार स्तरावर नागरी सेवा परीक्षा आणि राज्य शासन स्तरावर राज्य सेवा परीक्षा यात काही समानता आहेत. उदाहरणार्थ, या दोन्ही चाचण्यांमुळे अधिकारी स्तरासाठी निवड होऊ शकते. गट-अ आणि गट-ब या दोन्ही स्तरावर अधिकारी पदांच्या निवडी आहेत. या दोन्ही परीक्षा पूर्व परीक्षा (pre-examination), मुख्य परीक्षा  (main examination) आणि व्यक्तिमत्व चाचणी (personality test) या तीन टप्प्यात होतात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा परीक्षेद्वारे विविध पदांची निवड केली जाते. एमपीएससी (MPSC) खालील प्रमाणे परीक्षा आयोजित करते.

MPSC State Services Examination - राज्य सेवा परीक्षा 

➤ MPSC Maharashtra Forest Services Examination - महाराष्ट्र वनसेवा परीक्षा

➤ MPSC Maharashtra Agricultural Services Examination - महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा

➤ MPSC Maharashtra Engineering Services Gr-A Examination - महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा

➤ MPSC Maharashtra Engineering Services Gr-B Examination - महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा

➤ MPSC Civil Judge (Jr Div), Judicial Magistrate (Ist Class) Competitive Exam - दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा

➤ MPSC Asstt. Motor Vehicle Inspector Exam - सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा

➤ MPSC Assist. Engineer (Electrical) Gr-II, Maharashtra Electrical Engg Services, B – सहायक अभियंता (विद्युत) श्रेणी -2, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट-ब

➤ MPSC Police Sub-Inspector Examination - पोलीस उपनिरीक्षक परीक्षा

➤ MPSC Sales Tax Inspector Examination - विक्रीकर निरीक्षक परीक्षा

➤ MPSC Tax Assistant Examination - कर सहायक गट-क परीक्षा

➤ MPSC Assistant Examination - सहायक परीक्षा

➤ MPSC Clerk Typist Examination - लिपिक-टंकलेखक परीक्षा 


एमपीएससी परीक्षा कोण देऊ शकतो ? पात्रता (MPSC Exam Eligibility) / Who is eligible for MPSC ?

कोणत्याही शाखेचे वयाची 19 वर्षे पूर्ण केलेले पदवीधर उमेदवार ‘राज्य सेवा परीक्षा’ साठी पात्र होऊ शकतात. खुल्या गटातील उमेदवार या परीक्षेसाठी वयाच्या 38 वर्षांपर्यंत आणि आरक्षित गटातील विद्यार्थी 43 वर्षे वयापर्यंत या परीक्षेस बसू शकतात. तुम्ही किती वेळा ही परीक्षा देऊ शकता यावर कोणतेही बंधन नाही. पण ही चाचणी वयोमर्यादेत कितीही वेळा घेतली जाऊ शकते. या परीक्षेसाठी उमेदवारांना महाराष्ट्राचे डोमिसाईल प्रमाणपत्र (Domicile Certificate of Maharashtra) असणे गरजेचे आहे.

नक्की वाचा >> MPSC अभ्यासक्रम (Syllabus-Prelims-Mains) | Spardha pariksha

‘राज्य सेवा परीक्षा ’ (State Service Examination) मराठी किंवा इंग्रजी भाषेत दिली जाऊ शकते, तरी उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. शालेय प्रमाणपत्र परीक्षेमध्ये उमेदवाराने मराठी विषय घेतलेला असावा.

MPSC फॉर्म भरताना लागणारी आवश्यक कागदपत्रे ? / What you will need before filling MPSC Form

➤ दहावीचे पास असल्याचे मार्कशीट (10 Marksheet)

➤ आधार कार्ड (Aadhar Card)

➤ ई-मेल आयडी (E-Mail ID)

➤ मोबाईल नंबर (Mobile Number)

➤ महाराष्ट्र डोमिसाईल सर्टीफिकेट (Maharashtra Domicile Certificate)

➤ जातीचा दाखला (Cast Certificate)

➤ नॉन क्रेमिलिअर सर्टीफिकेट (Non Creamy layer Certificate)

➤ स्कॅन कॉपी फोटो (साईझ ५०के बी )
(Width 125 to 130 pixels , Height 125 to 170 pixels)

➤ स्कॅन कॉपी सही (साईझ ५०के बी )
(Width 125 to 130 pixels , Height 50 to 60 pixels)

➤ तसेच तुम्हाला तुमची उंची (Height in cms) , छाती (Chest in cms) , वजन (Weight in kgs) माहित असणे आवश्यक आहे.

MPSC फॉर्म कसा भरावा? /  How to fill MPSC Form?

१) तुम्ही हे आर्टिकल वाचत असाल तर काळजी पूर्वक लक्ष द्या , एमपीएससी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर जायचे आहे. या क्रिया केल्यानंतर पुढे तुम्हाला वरती LOGIN दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे , आता तुमच्यापुढे दोन पर्याय दिसतील एक म्हणजे Candidate Login आणि दुसरे म्हणजे Admin Login. यापैकी तुम्हाला Candidate Login करायचे आहे कारण आपण उमेदवार (Candidate) आहोत. 

२) वरील सर्व क्रिया केल्यानंतर , जर तुम्ही नवीन उमेदवार असाल तर तुम्हाला New User Registration वर क्लीक केले पाहिजे पण जर तुम्ही आधीच जुने वापरकर्ते असाल तर तुम्हाला User Name आणि password सबमिट करून Login वर क्लीक करायचे आहे. जर तुम्ही तुमचा पासवर्ड किंवा यूजर नेम विसरला असाल तर खाली Forget Password म्हणून पर्याय आहे त्यावर क्लीक करून तुम्ही ते रीसेट करू शकता.

MPSC Exam म्हणजे काय ? पात्रता (MPSC Exam Eligibility) ? || Spardha Pariksha-जोशमराठी
MPSC Exam म्हणजे काय ? पात्रता (MPSC Exam Eligibility) ? || Spardha Pariksha-जोशमराठी

३) Forget password वर क्लीक केल्यानंतर नवीन विंडो उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा फोन नंबर / ई-मेल टाकावा लागेल तसेच तुम्हाला जन्म तारीख हि भरावी लागेल हे सर्व केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ई-मेल किंवा फोन नंबर वर एक मेसेज येईल तो वन टाइम पासवर्ड असेल (Otp) तो इथे सबमिट करावा लागेल. हे केल्यानंतर तुम्हाला तुमचा नवीन पासवर्ड दोन वेळा भरायला सांगितले जाईल , तो तुम्ही अचूक भरा व सबमिट करा ,आता तुमचा पासवर्ड रीसेट झाला.

४) New User Registration वर क्लीक केल्यानंतर एक नवीन विंडो उघडेल त्यामध्ये तुम्हाला यूजर नाव तयार करावे लागेल तसेच ई-मेल आयडी व मोबाइल वेरिफिकेशन करायचे आहे. त्यानंतर जन्म तारीख  , पासवर्ड तोच पासवर्ड पुन्हा भरून वेरिफिकेशन फोटो मधील अंक व अक्षरे सबमिट करून Create User वर क्लीक करायचे आहे. असा तुमचा लॉगिन आयडी तयार होईल.

MPSC प्रोफाइल कशी बनवावी / Profile Creation

१) तुमचा लॉगिन आयडी तयार झाल्यानंतर लॉगिन करा त्यानंतर प्रोफाइल बनवण्यासाठी  Profile Creation वर क्लिक करावे लागेल , त्यानंतर नवीन विंडो उघडेल ज्यामध्ये तुम्हाला ५-६ स्टेप दिसतील त्यामध्ये माहिती भरायची आहे. आता स्टेप १ मध्ये तुम्हाला आधारकार्ड नंबर भरायचा आहे ,तुमचं नाव व माहिती ऑटोमॅटिक येईल. आणि खालील टेबल मध्ये भरली जाईल. अपलोड वर क्लीक करायचं आहे.

२) स्टेप २ मध्ये तुम्हाला तुमचे नाव , वडिलांचे नाव ,आडनाव तुमची माहिती , जेण्डर  ,जन्मतारीख ,ई-मेल जी जी माहिती विचारेल ती भरायची आहे. तसेच फिजिकल माहिती जसे उंची , छाती याची अचूक माहिती भरायची आहे त्यानंतर जात (Caste) तुम्ही कोणत्या कॅटेगरी किंवा ओपन असाल तर तिथे सिलेक्ट करावे लागेल. त्यानंतर नॉन क्रेमिलिअर सर्टिफिकेट द्यायचं आहे. त्यामध्ये जी माहिती दर्शवली आहे ती भरायची आहे. नंतर तुम्हाला orphan Reservation च सर्टिफिकेट द्यावे लागेल ते नसेल तर तुम्हाला Acknowledgement Form भरून द्यावं लागेल.

आता पुढे कायमचा पत्ता (Permanent Address) किंवा corresponding address भरायचा आहे , हि सर्व माहिती भरताना काळजीपूर्वक भरायची आहे.

३) स्टेप ३ इतर माहिती (Other Information) या विभागात तुम्हाला  Service men किंवा खेळाडू असाल तर या नो मध्ये क्लीक करायचे आहे Yes असल्यास पुढची माहिती विचारली जाते ती भरावी लागेल. आता additional information मध्ये तुम्हाला तुमच्यातील Good Qualities भरायच्या आहेत (साकारात्मक गोष्टी भराव्या).

ब्लॅक लिस्ट (Black List) - या विभागात तुम्हाला विचारले जाईल जसे तुमच्यावर कोणती केस असेल किंवा खटला चालू असेल तर तुम्ही एस किंवा नो सिलेक्ट करायचं आहे , मित्रानो जर तुमच्यावर खरच एखादी केस असेल तर बिनधास्त एस करा त्याचा फक्त रेकॉर्ड ठेवावं लागतो तसेच त्याची पडताळणी केली जाते त्यानंतर ठरवलं जात कि तुम्ही किती खर बोलता , केस असेल तर Yes करा नसेल तर No करा.

४) स्टेप ४ हि Qualification (शिक्षणासंबंधित) असेल ज्यामध्ये तुम्हाला १० वी पासून पदवी परीक्षेपर्यंतच्या सर्व कागदपत्रांची गरज लागणार आहे  त्या संबंधित माहिती येथे तुम्हाला भरायची आहे. (१० वी ,१२वी ,पदवी) एक गोष्ट लक्षात घ्या जी माहिती तुमच्या कागदपत्रांवर आहे तीच माहिती तुम्हाला इथे भरायची आहे.

५)  Experience Details (कामाचा अनुभव) हा स्टेप ५ मध्ये विचारला जातो ज्यामध्ये आपल्याला जितकी वर्षे अनुभव आहे तितकी वर्षे  सांगायचे आहेत. जी काही खरी माहिती आहे ती येथे तुम्हाला भरायची आहे.

६)  Upload Photo / Signature : या शेवटच्या स्टेप मध्ये तुम्हाला फोटो व सही अपलोड करायची आहे. काही वेळा असं होत कि सही व फोटो अपलोड करून सुद्धा सेव होत नाही. याच कारण म्हणजे तुमच्या फोटोची साईझ ,केबी ,Formate वर सांगितल्या प्रमाणे नसते. तर आधीच या सर्व गोष्टींची तयारी करून ठेवा आणि मगच फॉर्म भरायला घ्या.

आता Save वर क्लीक केल्यावर Online Application येईल त्यावर क्लिक करायचे आहे. एक नवीन विंडो उघडेल ज्यामध्ये State Service Preliminary Examination दिसेल तिथे Apply Start Date व Date Of Closing  असेल , शक्यतो MPSC  Preliminary Examination परीक्षा देणार्यांनी फॉर्म फील स्टार्ट झाल्यावर लगेच भरायला हवा त्यामुळे तुम्हाला हवे ते सेंटर मिळेल.

MPSC (Maharashtra Public Service Commission)  Rules Of  Procedure पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.


मंडळी MPSC Spardha Pariksha पात्रता , मुख्य परीक्षा कोणत्या असतात ? फॉर्म कसा भरावा ? , प्रोफाइल कशी बनवावी , आवश्यक कागदपत्रे या बाबत तुम्हाला माहिती मिळाली असेल , हि माहिती तुम्हाला कशी वाटती हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका कारण तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप मौल्यवान असतो. पुढच्या लेखात MPSC Syllabus आणि अभ्यास कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले जाईल तरी आपल्या जोश मराठी (www.joshmarathi.com) संकेतस्थळाला भेट देत राहा.


🔅 खालील लेख MPSC स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचे आहेत :

👉 नक्की वाचा >> MPSC अभ्यासक्रम (Syllabus-Prelims-Mains) | Spardha pariksha

👉 नक्की वाचा >> MPSC राज्यसेवा Interview ची तयारी व मार्गदर्शन (Guidance)

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने